Posts

माझा valentine 2023

  7 तारखेला rose day... वाटलं सगळ्यांसारखं तुलाही मी आज एक फूल द्यावं....... पण नंतर आलं लक्षात की त्या फुलाला त्याच्यापेक्षा सुंदर फूल दाखवून ...…. कशाला दुखवावं.....😊 8 ला propose day.... या दिवशी करणार तरी काय मी अस खास...... कारण तू तर तेव्हाच माझी झाली .... जेव्हा माझी नजर पहिल्यांदाच तुझ्या ... नजरेला बोलली होती,  जगात भारी माझी राणी.... 9 ला chocolate day Chocolate देऊन मी तरी काय wish करणार तू आहेस च एवढी गोड की, त्या chocolate मधली गोडी तरी काय तुझी बरोबरी करणार ..... 10 ला teddy day वाटलं मीही तिला cute अस teddy द्यावं ....... पण विचार केला की, तिलाच तिला भेट देऊन मी तरी कसं wish करावं ......... 11 ला promise day आपल्यामध्ये promise या शब्दाची अडचण हवी च कशाला जस आत्तापर्यंत जपलय... आहोत तोपर्यंत असच जपुया.... 12 ला hug day ... मलाही वाटलं होतं आज की..... तुला मिठीत घ्यावं ..… पण नंतर विचार केला की , तुला मिठीत घेऊन भर हिवाळ्यात/उन्हाळ्यात मी ... पावसाला कशाला निमंत्रण द्यावं..... 13 ला kiss day या दिवशी नाही बरं मला सगळ्यांसारखं वाटलं

माझा Valentine 2023

Image
माझ्याकडे कामा मुळे वेळ नाही, ना तीच्या कडे कॉलेज मुळे टाईम कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..? बोलायला जावं म्हटलं तर व्याकरणात अडतयं घोडं आम्हाला तीचं वेड प्रेम आणि mature बोलणं बाउन्सर, तीला मराठी कोडंपत्र लिहायला घेतलं तर साली सुचत नाही लाइन कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..? विचार केला करायचं का "कयामत तक" आमिरसारखं.? त्याला जुही मिळाली, आम्हाला घर ही व्हायचं परकं ! आमच्या स्टोरीत नुसतेच व्हिलन कुठाय "हिरॉइन"? कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..? सरते शेवटी कंटाळून घातलं विघ्नह्र्त्याला साकडं म्हणाला तुलाच नाचता येईना अंगंण कुठं वाकडं...?? "सध्या शेड्युल्ड बिझी आहे,  पुढ्च्या वर्षी पाहीन" कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..? आता कळतंय मला हा प्रेमाचा सगळा खोटा थाटखरं माझी राणी, स्वत्ताहुनच येईल मग शोधत पुण्याची वाट सगळेच दिवस मग प्रेमाचे, कशाला हवा हा व्हॅलेंटाईन...??

राणी फक्त तुझ्यासाठी..

 खूप काही असेल आणि आहे बोलण्यासाठी , पण फक्त शब्द तुझ्यापर्यंत पोहचतील अस नको वाटत  जेव्हा मी तुझ्यात सामावून जाईल तेव्हा असेल खूप काही बोलण्यासाठी , जेव्हा तुझा हात हातात राहील तेव्हा असेल खूप काही सांगण्यासारखं , जेव्हा अश्रू पुसायला माझा खांदा असेल  जेव्हा जगण disney वर्ल्ड वाटेल  आणि आयुष्य कमी वाटेल पण तरीही असेल खूप काही सांगण्यासारखं , पण आजकाल काय झालंय न की फोन वर कितीही बोललं तरी आपण काहीतरी व्यक्त झालो अस नाही वाटत , त्याउलट बोलणं हे गैरसमज होण्याची भीती वाटते, संवाद साधून मन मोकळं करायला मी काही वाटेत भेटलेला unknown माणूस नाही किंवा जगातला स्वार्थी समाज नाही , मला माझं आयुष्य हवं आहे  आणि माझं आयुष्य तू आहेस , आणि जेव्हा अस तुला मनापासून वाटेल तेव्हा असेल न खूप काही सांगण्यासारखं .... राणी फक्त तुझ्यासाठी.....

लग्न लग्न लग्न म्हणजे नेमकं काय

 लग्न लग्न लग्न म्हणजे नेमकं काय  जेवताना कुणाची तरी सोबत मिळणं म्हणजे लग्न ... वेळेची मर्यादा न पाळता भेभान होऊन बाईक वरून फिरायला आवडत मला,  पण नकळत कुणाचा हात खांद्यावर विसावला तर वेगाची मर्यादा जानवण म्हणजे लग्न ..... मुसळधार पावसामध्ये एकाच छत्रीमध्ये अर्धवट भिजणं आणि अर्धवट कोरड राहणं म्हणजे लग्न ....... दिवसभर कामाची दगदग झाल्यावर घरी गेल्यावर आपल्यासाठी कुणीतरी दार उघडंण म्हणजे लग्न ...... शब्दशिवाय संवाद साधता येणं म्हणजे लग्न ..... शब्दांना संवादाच बंधन च नसणं म्हणजे लग्न ...…. दोन जणांनी एकत्र येऊन चार भिंतींना घडवणं म्हणजे लग्न ....... एखादं धरपडलं तर दुसर्याने लगेच सावरन म्हणजे लग्न ........ आरशातही दिसणार नाही एवढं लक्ख आणि खर प्रतिबिंब समोरच्याच्या डोळ्यात दिसणं म्हणजे लग्न ...…... लग्न म्हणजे हक्क ,लग्न म्हणजे  हट्ट , लग्न म्हणजे समजून घेणं , लग्न म्हणजे सोडून देणं , लग्न म्हणजे श्वास, लग्न म्हणजे अट्टहास , लग्न म्हणजे आपल्या आनंदात कुणीतरी हसणं , लग्न म्हणजे आपल्या दुःखात कुणाच्यातरी डोळ्यात टचकन पाणी येणं ..…… लग्न म्हणजे आपल्यातलं आपलंपण सापडणं ..... लग्न म्हणजे खूप

आयुष्य

  आयुष्याच्या अनुभवातून शिकलेल्या महत्त्वाच्या गोष्टी कुणीतरी आपल्याला त्याची अवस्था , परिस्थिती , दुःख सांगत असताना आपण फक्त ते ऐकून घ्यायचं पण सल्ला देण्याचा अजिबात प्रयत्न करू नये ...जर तुम्ही तोंड उघडल तर ती व्यक्ती तुम्हाला भविष्यात काही सांगणार तर नाहीच नाही पण नात पण कमकुवत बनवेल. म्हणून जेव्हा ती व्यक्ती स्वतःहून म्हणेल की मला advice पाहिजे त्याच वेळेस च तुम्ही सल्ला देऊ शकता . एखादा व्यक्ती रागात असताना आपण फक्त mute राहायचं , otherwise तो राग आपल्यावर निघू शकतो . हे तर common च आहे. तुम्हाला Depression,mental stress, frustrations  अशा गोष्टी तुम्हाला तोपर्यंत जाणवत आहेत जोपर्यंत माझ्या सारखा व्यक्ती तुम्हाला भेटला नाहीये कारण Depression, mental stress नावाची कोणतीही गोष्ट जगात अस्तित्वात नाही ,  कारण जगातला सर्वात महान शास्त्रज्ञ म्हणून गेलाय की एक माणूस आयुष्यभरात आपल्या मेंदूचा खूप कमी टक्के वापर करतो आणि जर हे खरं असेल तर stress , dipression च्या definition चुकीच्या ठरतात .

🌈धुंद होती शब्द सारे

 खरंच इतकं सोप्प असत का आयुष्य ? आपण मनाच्या खोलवर जपलेली आपली मानस अशी का अंधुक होत जातात? आज भूतकाळ आठवला अचानक डोळ्यातून अश्रू आले आणि कळलं की आपण खूप दूर आलो आहोत आता मागे वळून पाहू की पुढे जाऊ कारण मागे फिरून गेल्यावर ही तेवढाच संघर्ष आहे आणि हाती काही उरणार नाही आणि पुढे गेल्यावर काय होईल याची तिळमात्र सुद्धा कल्पना नाही .. मला काय करायला हवं ? आयुष्यात नाही नाही म्हणता 24 वर्ष झाली सतत प्रयत्न करून की नाही एक दिवस तरी नक्की येईल माझा आणि प्रयत्न ही अविरत चालू ठेवले आजही वर्तमानात जगताना अगदी आनंदी असतो मिळालं ते काम आनंदाने करतो. मोजके मित्र मैत्रिणी आहेत पावलोपावली मदत करतात.. नोकरी चालू आहे ..मनासारखी नाही पण ह्या काळात तिचा आधार आहे .. मनाला हवी तशी नोकरी शोधणं चालू आहे ..आईचा वडिलांचा नातेवाईकांचा फोन होतो .. Weekend मजेत घालवतो , वेगवेगळे छंद जोपासतो , हळुवार माझ्या कलेला फुंकर घालतो .सोबतीला नवीन नवीन गोष्टी शिकून घेतोय ... पण भविष्याचा हिशोब काही केल्या लागत नाही.. घरच्यांची अपेक्षा आहे की योग्य वयात लग्न कराव लागेल पण मी सर्व manage करू शकेल का याची शंका आहे त्यात शिकलेल

माझी माय म्हणते...

 माझी माय म्हणते 😑😔 असा कसा दिस बाई डोळ्या देव दावा  सुखाची घागर तिला मातीचा ओलावा  आला दिस गेला दिस उन्हळा उन्हाळा  मुकाट्याने सोसायच्या मरणाच्या झळा .... जगण्याची धग आता सरली सरली  फुपाटा उडून मग सावली उरली  दुःखाचे जातील दिस मिळेल सावली  पाळणा हलवीत येईल मायेची माऊली