माझी माय म्हणते...
माझी माय म्हणते 😑😔
असा कसा दिस बाई डोळ्या देव दावा
सुखाची घागर तिला मातीचा ओलावा
आला दिस गेला दिस उन्हळा उन्हाळा
मुकाट्याने सोसायच्या मरणाच्या झळा ....
जगण्याची धग आता सरली सरली
फुपाटा उडून मग सावली उरली
दुःखाचे जातील दिस मिळेल सावली
पाळणा हलवीत येईल मायेची माऊली
Comments
Post a Comment