"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2

चुकलोय का मी ??
माहीत नाही पण खूप दिवस झाले सतत मनाला अस्वस्थता वाटत राहते
आपलं राज्य सोडून आपण आलोय खरं पण ज्या गोष्टी आपण सोडल्या आहेत जस की घर ,आई वडील ,भाऊ बहीण ,आजी आजोबा सर्वांपासून नकळत दूर जातोय त्यामुळे कधीकधी मनाला प्रश्न पडतो की खरच आपण वाट चुकलोय का? ह्या जगाच्या मायानगरीत हरवलो की काय ?
आपण परत भेटू शकतो ना? की ह्या जगात कुठेतरी हरवून जाऊ 😢
तुम्हाला सांगतो जस माझं शिक्षण पूर्ण होतंय तसा तसा मी दूर जातोय सुरुवातीला डिप्लोमा complete झाल्यावर त्यानंतर आता इंजिनीरिंग संपल्यावर महाराष्ट सोडला
पण खर सांगू का करिअर बनवायचं म्हटलं ना की काहीतरी आपल्या हातून सुटणार हे नक्की कारण ह्या competition च्या युगात जगायचं असेल तर आपल्याला धावायला लागेल ..
बरं ठीक आहे आपल्याला मिळालाही एखादा settle जॉब पण ज्यांच्यासाठी आपण हे सर्व प्रयत्न करतोय त्यांना परत मिळवता येईल का मला ?😢
  मला घरी जायचंय! कुठलीही चिंता काळजी न करता निवांत शेतात माळरानात भटकायचं आहे, शेतात काम करायचं आहे, मनसोक्त आईच्या हातची रुचकर भाजी भाकरी चटणी खायची आहे ,रात्री आईच्या कुशीत झोपी जायचं आहे.. पण माझं हे स्वप्न अधुर तर राहणार नाही ना की मीही इतरांसारखा ह्या जगात हरवून जाईल ...
आपलं कसं झालय माहितीय का "गुनाहो की राह पर एक बार चल पडे तो ना रुक सकते हो ना मूड सकते हो..."
 एकदा करिअर च्या मागे लागलं ना तर मग no turning back मागे टाकून दिलेली माणस छोट्या छोट्या टिपक्यांसारखी दिसू लागतात आणि मग नाहीशी होतात दिसतच नाही जेव्हा ही वाट संपेल ना तेव्हा आपण एकटे असू😢
गावाकडे घर आहे शेत आहे आई बाबा आहेत पण घरातला सोफा बेड सोडला ना की आपलं अस काहिच वाटत नाही .. कमावलेले पैसे खर्च करायला वेळ नाही ज्या लोकांसाठी ते कमवायचे आहेत त्या लोकांचा कॉल आला की मी busy आहे मला disturb नका करू कॉल करू नका ह्या पलीकडे आपल्याला बोलण्यासारखं काही नाही मग मला प्रश्न पडतो की करिअर महत्वाचं की ह्या जगण्यातला ते फक्त एक भाग आहे की ते जगन महत्वाचं आहे
I think life is important हे करिअर ना virus सारख आहे ये अपना दिल दिमाग corrupt कर देता है we are machines now target set भागना शूरु..
मनात जे येईल ना ते त्याक्षणी करता आलं पाहिजे, रडणं, हसणं,सोडून देणं , धरून ठेवण अगदी त्याक्षणी बिनधास्त माझ्या मित्रासारखं सोपान सारख 🤗..
Dedicated to my best friend sopan sherekar..

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023