माझा Valentine 2023
माझ्याकडे कामा मुळे वेळ नाही, ना तीच्या कडे कॉलेज मुळे टाईम
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?
बोलायला जावं म्हटलं तर व्याकरणात अडतयं घोडं
आम्हाला तीचं वेड प्रेम आणि mature बोलणं बाउन्सर,
तीला मराठी कोडंपत्र लिहायला घेतलं
तर साली सुचत नाही लाइन
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?
विचार केला करायचं का
"कयामत तक" आमिरसारखं.?
त्याला जुही मिळाली,
आम्हाला घर ही व्हायचं परकं !
आमच्या स्टोरीत नुसतेच व्हिलन
कुठाय "हिरॉइन"?
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?
सरते शेवटी कंटाळून घातलं
विघ्नह्र्त्याला साकडं
म्हणाला तुलाच नाचता येईना
अंगंण कुठं वाकडं...??
"सध्या शेड्युल्ड बिझी आहे,
पुढ्च्या वर्षी पाहीन"
कसा व्हायचा तीचा आणि माझा व्हॅलेंटाईन..?
आता कळतंय मला हा प्रेमाचा
सगळा खोटा थाटखरं
माझी राणी, स्वत्ताहुनच येईल मग शोधत पुण्याची वाट
सगळेच दिवस मग प्रेमाचे,
कशाला हवा हा व्हॅलेंटाईन...??
😍🥺😔❤️
ReplyDelete