लग्न लग्न लग्न म्हणजे नेमकं काय
लग्न लग्न लग्न म्हणजे नेमकं काय
जेवताना कुणाची तरी सोबत मिळणं म्हणजे लग्न ...
वेळेची मर्यादा न पाळता भेभान होऊन बाईक वरून फिरायला आवडत मला, पण नकळत कुणाचा हात खांद्यावर विसावला तर वेगाची मर्यादा जानवण म्हणजे लग्न .....
मुसळधार पावसामध्ये एकाच छत्रीमध्ये अर्धवट भिजणं आणि अर्धवट कोरड राहणं म्हणजे लग्न .......
दिवसभर कामाची दगदग झाल्यावर घरी गेल्यावर आपल्यासाठी कुणीतरी दार उघडंण म्हणजे लग्न ......
शब्दशिवाय संवाद साधता येणं म्हणजे लग्न .....
शब्दांना संवादाच बंधन च नसणं म्हणजे लग्न ...….
दोन जणांनी एकत्र येऊन चार भिंतींना घडवणं म्हणजे लग्न .......
एखादं धरपडलं तर दुसर्याने लगेच सावरन म्हणजे लग्न ........
आरशातही दिसणार नाही एवढं लक्ख आणि खर प्रतिबिंब समोरच्याच्या डोळ्यात दिसणं म्हणजे लग्न ...…...
लग्न म्हणजे हक्क ,लग्न म्हणजे हट्ट , लग्न म्हणजे समजून घेणं , लग्न म्हणजे सोडून देणं , लग्न म्हणजे श्वास, लग्न म्हणजे अट्टहास ,
लग्न म्हणजे आपल्या आनंदात कुणीतरी हसणं , लग्न म्हणजे आपल्या दुःखात कुणाच्यातरी डोळ्यात टचकन पाणी येणं ..……
लग्न म्हणजे आपल्यातलं आपलंपण सापडणं .....
लग्न म्हणजे खूप काही , जास्त काही जे मला अजून सापडलं नाही , मी अजूनही माझं लख्ख प्रतिबिंब दिसणारे डोळे शोधतोय ......…...अजूनही मी धरपडल्यावर मला सावरणारे हात शोधतोय , आणि मी अजूनही हेच सांगतोय की लग्न म्हणजे टिकवणं नाही तर लग्न म्हणजे बहरन..😊...👍What exactly is marriage marriage marriage?
Being with someone while eating means marriage...
I like to ride my bike with fear without following the time limit, but knowing the speed limit if someone's hand rests on my shoulder unknowingly.
Comments
Post a Comment