असच कधीतरी...




सूर्यास्ताला डोळे भरून पहायचे
सागरतीरी बोटे गुंफत हसायचे..
.
छाटू आपण झाड तोडत्या हाताला
पावसातपण वृक्षारोपण करायचे..
.
आवड नाही मुळीच काही रंगांची
इंद्रधनूला हातांमध्ये धरायचे..
.
बंगल्यातल्या वास्तव्याचा कंटाळा
शेतामधल्या खोपटात चल रहायचे..
.
गर्दीमध्ये श्वास कोंडतो फिरताना
गंध मोकळ्या एकांती मग बसायचे.

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2