मनगुज☺️.
#अनुराग
तोच मी तो तेंव्हासारखाच क्षण ...हरवलंय फक्त आपल्यातलं संभाषण ...तेव्हा निमित्त शोधत असू शब्दात शब्द जोडायला.. आज म्हणतोय नको उगाच शब्दाने शब्द वाढायला ..हो की नाही हल्ली असंच काहीतरी होत चाललंय सर्व नात्यांमध्ये...
जाणिवांच्या सर्व सीमांवर आरोपांच्या फैरी आहेत,
म्हणूनच एकांताचे चार क्षणही आज आडवैरी आहेत .
म्हणूनच निसर्गाविषयी एक गूढ आकर्षण आहे
देह आणि निसर्ग एकरूप होत जाण
बहुरंगी पण सतत बदलणार
कधी भंगणार तर कधी अभंग.....
मग मन कधी विशाल सागर बनून जात
अंदाज न येणार हिमकड्यासारखं चमकणार
इच्छा आणि गैरसमजाची वादळ
सगळं धोकादायक तरीही दिपवून टाकणार ....
माझं मन आणि अश्रू दोन्हीही इथल्या मातीसारखं
भणंग आणि नापीक ...जिथे कधीही पालवी फुटणार नाही काहीही अंकुरणार नाही फक्त निसर्गाचा तांडव बघायचं आणि स्मितीत होऊन अंतिम क्षणापर्यंत रेटायचं म्हणूनच निसर्गाविषयी गूढ आकर्षण आहे ...
Comments
Post a Comment