माझा दिवस आणि मी 🤗



रोज सकाळी तरंगणाऱ्या
दिवसाला मी उड्या मारुनी
पकडू जाता
 कधी हूल देऊन निसटतो
 आणि कधी तो कुशीत येतो....

 अशी पकडतो कॉलर माझी
आणि पुढे मग नेईल कोठे ?
ठाऊक नसते ,नाईलाज पण
असतो माझा की मी
त्याच्या मागे जातो .

ओमकाराच्या मठीत किंवा
प्रश्नचिन्ह खांद्यावर घेऊन
पळण्याची तो शिक्षा
 देतो दिवसभराची
 आणि निमुट मी पळत राहतो.

कधी अचानक वळण घेऊनी
वर्तणूक मानून चांगली
शिक्षे मधुनी मिळते सुटका ,
आणि दुपारी हसत हसत तो
 चहा पाजतो

सूर्यास्ताला ठेवून साक्षी
निघता निघता
देतो वचने  मैत्रीची तो
आणि तरीही पुढे जाऊनी मागे पाहुन
छद्मी हसतो .

©सलील कुलकर्णी.#fb

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2