आनंदाश्रू 🤗🤗😍😍




कुणाला कशाचं सुख तर कुणाला कशाचं ह्या जगात अश्या कितीतरी गोष्टी असतात की, ज्या आपल्याला सुख देऊन जातात पण मला विचारलं ना तर माझं एकच उत्तर असेल ते म्हणजे " मला माझ्या आईच्या डोळ्यातला आनंद सुख देऊन जातो" .. माझी आई एकदम साधी सरळ शिक्षणातल क ख सुद्धा माहीत नसलेली तरीही जगण्याची सरळ सोपी व्याख्या मी तिच्याकडून च शिकलो ..😊😊😊
आजपर्यंत मी नेहमी आशावादी राहत आलेलो नेहमी आईबाबांना समाधान वाटेल अशाच गोष्टी केल्या ..☺️
आईच स्वप्न होत की आपल्या मुलाने नेहमी पहिल्या नंबर वर असायला हवं अभ्यासात तसा लहानापासून ठरवलं च की पहिला नंबर आपलाच आणि तो मी मिळवत राहिलो, पण नंतर इंजिनीरिंग मधे कळालं की, नंबर कितीही असला तरी knowledge च काय?? आपण फक्त नंबर मिळवण्यासाठी अभ्यास करायचा ?? 🤔मग जरा मी स्वतःला knowledge कडे घेऊन जायचा प्रयत्न केला आणि 1st इयर झाल 2nd इयर ही झालं आता final इयर मध्ये top करायचा ठरवून घेतलं😎 कारण आईचा शब्द आणि समाधान मला महत्वाचं वाटलं आणि last इयर ला class मध्ये first आलो त्याची ही ट्रॉफी मिळाली . ती ट्रॉफी बघितल्यावर आईच्या डोळ्यातला आनंद बघितला आणि अक्षरशः मी त्यात हरवलो ...जेवढा मला ट्रॉफी मिळाल्याचा आनंद झाला नसेल तेवढा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता ..
आज मला माझ्यासाठी ही Achievement कमी वाटत असली तरी माझ्या मायेसाठी ती लाखमोलाची होती ..एक दिवस मला माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू बघायचे आहेत तो दिवस माझ्यासाठी सर्वांत जास्त आनंदाचा आणि लाखमोलाचा असेल...
©सोपान..


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2