#love #life #career #शहाणपण
मला न आज खूप आनंद होत आहे हा लेख लिहिण्यासाठी . हा लेख वाचून माझे काही मित्र सुधरतील अशी मला अपेक्षा आहे .
त्यांच्यात काही बद्दल घडून येणं हा माझा मुख्य हेतू . कारण आता मला पाहवत नाही कि माझा हा कर्तृत्ववान मित्र कुणासाठी आपलं जीवन गमवेल.
कुणा एका परक्या व्यक्ती साठी स्वताचेे नाते तोडेल हे डोळ्यानि मला आता पाहवत नाही .
म्हणून माझ्या दोस्तांसाठी आपुलकीचा हा लेख खूप अंतकरणातून लिहिण्याचा प्रयत्न केला आहे .
खूप प्रेम करत होता हा तिच्यावर अगदी लहांनपानापासून . प्रेम तर हा करत होता
पण तिला कधी हा विचारू शकला नाही . कारण त्याला एकचं गोष्टी ची भिती होती आमची मैत्री तर तुटणार नाही ना, ती अबोला तर नाही धरणार , ती दूर तर नाही जाणार माझ्यापासून . बस याच कारणाने तो तिला विचारू शकला नाही .
ह्याने फक्त तिच्यासाठी जगणं सुरु केल . तिला खुश ठेवण्यासाठी हा पैशे उळवत गेला .
घरची परिस्तिथी खूप बेताची
आधीच वडील वारले होते . संपूर्ण घराची जिम्मेदारी त्याच्यावर होती . घरी एक लहान बहीण होती तिच्या लग्नाची तयारी इतक्या जबाबदाऱ्या त्याच्यावर होत्या .
तरी पण हा तिच्या प्रेमात इतका गुंतून गेला कि सुरवातीची गाठ कशी सोडवायची हे समजत नव्हते . तो खूप हुशार होता , प्रत्येक क्षेत्रात पारंगत होता, त्याची समाजात एक अलगच प्रतिष्ठा होती.
पण हा असा का वागत आहे , का बर हा अभ्यासात दुर्लक्ष करत आहे , ह्याच विचारात सगळे होते . आईला ही एकच चिंता की माझा लेक का असा वागत आहे , ह्याच चिंतेत ती जगायची पण हा प्रेमामुळे असा करेल असे कुणालाच वाटत नव्हते .
दिवसाहुन दिवसं सरत होते पण हा काही बदलला नाही .
मुलगा काही वेगळ पाऊल उचलेल म्हणून आई सुद्धा काही बोलायची नाही .
पण त्याने स्वतः मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न हि केला नाही .
आता बारावीची परीक्षा तोंडावर आली
पण हा तर तिच्याच मागे होता . अभ्यास शून्य झाला होता तरी याला काहीच घेेन देन नव्हतं . इतका कसा पागल झाला हा तिच्या प्रेमात कुणालाचं काही समजत नव्हतं . बारावीची परीक्षा झाली याला खूप कमी गुण आले , मात्र ती मुलगी जिल्ह्यात अव्वल आली होती . आता तर याला लाज वाटायची तिच्यासमोर जायची . ती मुलगी पण खुप शहाणी होती , याला आशेवर जगवत आली होती . ती त्याच्याशी खूप जवळीक दाखवायची ,आपल्या मनातल्या भावना त्याला सांगायची . बस इतक्यातच तो तिच्यात गुंतून जायचा .
आता तर घराजवळचे, समाजाचे याला पिसं लागलं असे म्हणू लागले.
तरी हा काही सुधारला नाही.याचं एक तर्फी प्रेम वाढत गेलं पण ती मात्र खूप शिकत गेली .
मित्रानो मला एक सांगावस वाटते कि हा इतका समजदार , हुशार, असूनही हा का असा झाला तो बरबाद होत चालला होता बस एका प्रेमामुळे.
आपण बाजीराव मस्तानी पाहिला
कित्ती शूर , चालाक होता बाजीराव .शेवटी मस्तानी च्या प्रेमात पडून स्वतःच आयुष्य गमावलं .
धडकन चित्रपट तर एके काळात लोकांची धडकन झाली होती .
अरे हो प्रेम करा पण कधी शिक्षण झाल्यावर कारण तेव्हा मुलीच आपल्या मागे लागतात .
प्रेमानेच सगळयाना मागे आणले आहे
तरी आपण प्रेमाला न भीता त्याचा स्वीकार करतो .
आणि आयुष्याचा परश्या करून बसतो .
शेवटी तो मुलगा तिच्याच प्रेमात असतो .आणि तिच्याच प्रेमात बरबाद होतो. अटकत अटकत हा शिक्षण घेतो .
अशीच ती एक दिवस गावाला येते .खूप शिकून चांगल्या पगाराची नोकरीवर असते . हा हिंमतीने तिला विचारून टाकतो . ती खूप हसते त्याच्यावर आणि हसता हसता रागात म्हणते तुझी लायकी आहे का माझा होण्याची . अशी म्हणूून ती निघून गेली. हा बस तिथेच उभा जसा च्या तसा प्रेमाचा पुतळा.
आयुष्य पूर्ण सरून गेलं शिक्षण अर्धवट आता काय कोणीच नौकरी देत नव्हते मग ह्याने कोणत्याही रोजीच्या कामाला जाणे सुरवात केली गरिबी दारिद्री वाढत गेली .
शेवटी आई वारून गेली , बहीण बेवडयाला गेली हा एकटाच अजूनही तिच्याच प्रेमात .
आता तो हसतो स्वतः वर , खूप राग येतो त्याला स्वताचाच, एकटाच राहु लागला .
मला खूप तो हसू हसू सांगू लागला .
पण मनातुन तो रडत होता त्याचे आसवं फक्त मीच पाहू शकलो . खुप कींव आली त्याची आणि राग येत होता मला या प्रेमाचा .आता तर खुप द्वेष करतो मी प्रेमाचा . बिचारा आता एकटेच जीवन जगतो आणि तिच्या प्रेमात अजूनही पागलासारखा वागतो .
मला आता एकच सांगायचं आहे
एक खूप हुशार विद्यार्थी , आयुष्यात खूप समोर गेला असता , शिकला असता तर
जर त्याने तिच्यासाठी शिकून तिला विचारलं असतं तर तीने नक्कीच त्याला स्वीकारल असत.
पण त्याने काय केले फक्त प्रेम आणि बस प्रेम म्हणून तो आता अश्या अवस्थेत आहे .
आणि आज प्रत्येक मुलं मुली असेच करत आहे .
आणि अमूल्य संपूर्ण आयुष्य गमवत आहे . आधी तर त्याला काहीच वाटलं नाही पन शेवटी तो मरू मरु स्वतःला दोष देत जगत आहे .
आता तुम्हीच यावर विचार करा मी घेतलेली हि एक प्रेमी ची व्यथा आहे .
तुम्ही तुमच्या मनावर घ्या आणि सुधरा .
तुंमची गरज आहे या देशाला , तुमच्या परिवाराला, निधान स्वतःच्या परिवारासाठी जीवन जगा त्यांना सन्मानाणे जगावा. कारण तुमचं जीवन खुप सूंदर आहे खरच ते नियमित जगा.
चांगले जगा आणि असे जगा कि जगण्यालाही तुमचा हेवा लागला पाहिजे.
प्रेम कर पण त्याची एक विशिष्ट वेळ असते .
बालवयात आईवर प्रेम करा ,
तरुण झाल्यावर शिक्षणावर प्रेम करा,
आणि जीवनात यशस्वी झाल्यावर तेव्हा मुलींवर करा
एक शेवटचं सांगणं 10 ते 12 वि हे वय मुलींच्या आकर्षणाचा असतं . ह्या वयात जपून जगा .खरंच जपून जगा . मी सुद्धा एक विद्यार्थी आहे आणि मला विद्यार्थी जीवनावर खूप प्रेम आहे आणि काळजी सुद्धा . माझ्या विचारावर थोडं लक्ष द्या , थोडा विचार करा .आणि खरचं जीवन खूप सुंदर आहे त्याला फालतू कामात बरबाद करू नका . खूप शिका आणि खरंच एक आदर्श व्यक्ती बना . खूप मज्जा येते हो जगायला आणि एक वेगळा आनंद प्राप्त होतो .चित्रपट पाहून बदलू नका .तुम्ही तुमचाच एक तुमच्या जीवनाचा चित्रपट बनवा .आणि या जगाचा एक उत्कृष्ट नायक बना .मग खरच आम्ही तुमचे चाहते बनु. हीच सरते शेवटी दहा बोटांची विनंती .
Comments
Post a Comment