पत्र 📜📃🗞️🗞️
एक पत्र आल ते तुम्हाला सांगतो खर तर ते सगळ्यांसाठी च आहे ...,
समस्त मनुष्यप्राण्यांना माझा नमस्कार ....
खर तर मी कोण, तुमच्यापैकी कुणीही मला पाहिलेल नाही ,पण तरीही बऱ्याच लोकांच्या मनात मी आहे,
तुमच्यापैकी कधीच कुणी माझ्याशी बोललेल नाही,
तरी लोक माझ्याविषयी तासंतास बोलतात,तुम्ही कधीच माझ्या घरी आलेला नाहीत ,पण असे कितीतरी घरे आहेत,वाडे आहेत,बंगले आहेत की जे माझ्या नावाने ओळखली जातात.....
मी भूत आहे .....हो मीच ते तुमच्या मनात असलेल भूत ..........
कुणीतरी मला पहिल आणि सांगितल तेव्हापासून बरेच लोक मला पहिल्याचा दावा करतात.
खर सांगतो तुम्ही मानस माझ्याविषयी एवढ्या खोटयानाटया गोष्टी सांगतात की तळपायाची आग मस्तकात जाते..
अरे मला काही इज्जत आहे की नाही
हायवे वर लिफ्ट मागतो अस सांगता,
काही लोक सांगतात की मी रस्त्यावरून चाललो होतो आणि मला भूत दिसल साडी घातलेल सारख मला बोलवत होत 😂आता हे सांगणार्याच्या तोंडाकडे बघितल तर बायको सुद्धा लवकर बोलवत नसेल याला😂😂 पण सांगणार काय साडीतल भूत बोलवत होत 😕
असे थापाडे लोक माझी इमेज घालवतात हो
अगदी महत्वाच् आणि खर सांगायच तर जगातल्या कुठल्या सिनेमात दाखवतात तसा मी नाही मी अगदी तुमच्यासारखा आहे तुमच्यातलाच एक आहे विश्वास बसत नाही पण हेच खर आहे
मी अगदी चारचौघांरखा आहे आणि हो भूत वैगेरे सगळ खोट आहे स्वतः मी भूत सांगतोय 100℅ भूत असत पण ते अस झाडाला लटकलेल नसत स्मशानात नसत भूत असत ते तुमच्यात तुमच्या जवळपास असत बऱ्याचदा तुमच्या घरातही असत मग तुम्ही म्हणाल भूताला ओळखायच कस भूताची काही लक्षणे आहेत ती तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक वाचा
भरपूर दारु पिलेल्या व्यक्तिने आपला चेहरा आरशात बघावा ते भूत च असत आन्दोलनाच्या नावाखाली दगडफेक करणारे बस जाळणारे भूतच असतात...
तुमच भयधारक,
भूत 😀..
😂😂😂👍👍👍
ReplyDelete