पिंपळ


फळांच्याच ओझीयाने उन्मळावे झाड तैसे माझे द्वाड प्राक्तन जाहले शाकारूनी नभ चंद्र घेतला मागून चांदण्यात पौर्णिमेच्या अंगण जळाले काजळल्या देव्हाऱ्यात काजवा पेटवा आता विठ्ठल भेटावा
खोल डोहातली साद उभा पिंपळ देहात अंगणात तुळशीला विझलेली तेलवात
रित्या डहाळीच्या तळी फुलांचा टातवा आता विठ्ठल भेटवा
मी पाचवी ला होतो तेव्हा मला उचलून high स्कूल ला टाकलं तेव्हा पहिल्यांदा मी गाव सोडलं आमच्या high school मध्ये लाकडी बेंचेस होते तेव्हा मला सारख वाटायचं की पूर आला पाहिजे घरची खूप ओढ लागायची त्या शहारामधली जी नदी होती ना ती गावाकडून जायची तर पूर आला असता ना ती लाकडी बाक वाहून गेली असती एका बाकावर असा ओनवा राहिलो असतो आणि हात पाय मारत ते बाक बरोबर गावाला घेऊन आलो असतो तराफा करून आणि आई काका काकी भाऊ सर्वाना भेटलो असतो
पृथ्वीचा केंद्र बिंदू तिथे होता जिथे ती उभी होती ती निघून गेली आणि माझे आक्षूंष आणि रेखाऊंश निखळू लागले जेव्हा जगायचं होत तेव्हा त्यासाठी मी काम करत राहिलो आणि जेव्हा काम संपवलं तेव्हा ज्यांच्या सोबतीने जगायचं होत ते निघून गेले आई नाही तीच घर नाही ती नाही माझं घर नाही मित्र तिकडे गेले मी जसा गाव सोडून गेले तस तेही गेले त्यांची मूल अजून कुठेतरी जातील त्यांचा पिंपळ कुठे असेल माझं घर कुठंय मी कुठं जाऊ
असुदे जगण्याच्या वाटा जन्मापेक्षा लांबलचक hututu म्हणत खोल श्वास घ्यायला हवा सवंगडी गेले पण खेळ कुठं थांबलाय जन्म आहे तर जिवंत असायला हव ना शीळ होऊन कस चालेल मातीत वाढलो आहे माती कुठं शिळी होते पाऊस येतोच 

Comments

  1. can you let me know about the Complete Song and where we can HEAR it ?
    Can you send the Link on my E mail [ vvkirtane@yahoo.co.in ] ???

    Vijay Kirtane

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2

माझा valentine 2023

एक अनोळखी स्वप्न