मी आहे असा आहे

उद्यापासून मी तुमच्या आठवणीतही नसेन..

हो असाच आहे मी विचित्र-विद्रोही..
म्हणूनच मला स्वतःला कुणावर लादायचं नाही
आणि कुणातही गुंतायाचंही नाही
सोबत आहे तुमच्या तोपर्यंत तुमचाच असेन
विखुरले जाऊ या छोट्याश्या जगात
तेव्हा माञ तुमच्या आठवणीतही नसेन..
आठवणीत ठेवावे कुणी
एवढा मी कुणाच्याही मनात बसत नाही
सोबतीने चार क्षण मजेत जगतो
पण पुन्हा ते क्षण दे!
अस बोलून देवालाही सतावत नाही..
कुणी माझ्यात गुंताव
एवढा मी मोहक नाही
कुणी माझ्याकडे पहावं
एवढा मी सुंदर नाही
तुमच्यासारख प्रत्येक वेळेला बदलणं
मला कधीच जमणार नाही,
न माझ्या वाटेनं चालणं
तुम्हाला कधी पेलणार नाही...
चार दिवसांची सोबत आनंदाने जगू
योग आलाच तर पुन्हा भेटेनही
पण कधी भेटीची वाट माञ नका बघू....
माहित आहे मला
माझ्या या विचित्रपणाचा
थोडा ञासही तुम्हाला झालाच असेल
पण आज सहन केलत मला
यासाठी ऋणी आहे मी सर्वांचा
उद्यापासून मी तुमच्या आठवणीतही नसेन..


Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2