#आईबाबा 😊
वाऱ्या पावसाची गाज
तसा माझ्या मायेचा आवाज ...
तिच्या डोईच्या बटांना
माती चिखलाचा साज ....
ज्वारी हुरड्याचा देठ
तशी माय माझी ताठ ...
भार वाहे संसाराचा
ती विठ्ठलाची वीट ...
माझा बाप लोखंडाचा
जसा फाळ नांगराचा....
जन्म नांगरीत जातो
वारकरी पंढरीचा.....
माय बाप तुझी आन
मला आहे सारे भान..
तुमच्या घामाच्या थेंबाना तोलतील माझे प्राण....
तसा माझ्या मायेचा आवाज ...
तिच्या डोईच्या बटांना
माती चिखलाचा साज ....
ज्वारी हुरड्याचा देठ
तशी माय माझी ताठ ...
भार वाहे संसाराचा
ती विठ्ठलाची वीट ...
माझा बाप लोखंडाचा
जसा फाळ नांगराचा....
जन्म नांगरीत जातो
वारकरी पंढरीचा.....
माय बाप तुझी आन
मला आहे सारे भान..
तुमच्या घामाच्या थेंबाना तोलतील माझे प्राण....
Comments
Post a Comment