रम्य संध्या आणि माझे सुखद क्षण 🤗
अशीच एक रम्य संध्याकाळ..
संध्याकाळेला कोणीतरी, कधीतरी दिलेलं हे "रम्य'' विशेषण Perfect Match झालय. संध्याकाळ असावी तर रम्यचं..ती रोजच असते. फक्त चेहरे बदलतात. तिला अनुभवणारे. कधी ती आपली असते तर कधी दुसऱ्यांची. पण संध्याकाळ ही असतेच...रम्य अशी..
सुर्य मावळत होता आणि वातावरणातील बदलाला सुरुवात होत होती. दिवसभर नकोसा वाटणारा सुर्य मावळताना मात्र हवाहवासा वाटू लागला होता. दिवसभर सगळ्यांना स्वतःच्या वर्चस्वाने त्रस्त करणारा हाच सुर्य जाताना मात्र सगळ्यांना सुखावून जातो. माझ्यासहित.
गॅलरीत उभा होतो. काहीतरी बघायचं होत. त्या रम्य विशेषणाला साजेसं असं. झाडांची सळसळणारी पाने, त्यामुळे येणारा थंड वारा, चिमण्यांची चिवचिव, कोकिळेचं मधुर कुजन, एकंदरीत पक्ष्यांचा किलबिलाट, तो गारवा हे सगळं परिचित होत. हे रोजचं होत होतं. न चुकता. बाह्यअंगापर्यंत मर्यादित असणाऱ्या ह्या गोष्टी आज अंतरंगात घर करू पाहत होत्या. मग मीही त्यांना अडवलं नाही.
धकाधकीच्या या आपल्या जीवनात कृत्रिम सुखाच्या मागे धावताना निसर्गाकडून मिळणाऱ्या रोजच्या आनंदाला मुकणाऱ्या तुमच्यातीलच मला आणि कदाचित तुम्हालाही तो बघण्यासाठी, मिळविण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी एका जाणीवपूर्वक नजरेने त्याच्याकडे पहाव लागत होत. आणि मला मिळणारं ते सुखं कदाचित इथे व्यक्त करण्यापलीकडचं होत. कधीकाळी चालता-बोलता हे सगळ अनुभवणाऱ्या आपल्याला आज ते अनुभवण्यासाठी एका जाणीवेची गरज भासत होती आणि ती जाणीव होण्यासाठी एका एकांताची...असो.

Comments
Post a Comment