@मी आणि माझ्या भूमिका
भूमिकांचं पत्र
प्रिय नातलग मित्रमंडळी आणि समाज ,
नमस्कार खूप दिवसांपासून मी बोलण्याची वाट बघत होता ना मग आज थोडा वेळ काढा आणि हे पूर्ण पत्र वाचा.
मी पण कंटाळलो आहे. आता तेच तेच प्रश्न ऐकून मी लोकांशी बोलत का नाही?सर्वांमध्ये मिसळत का नाही?विविध कार्यक्रमांना का उपस्थित राहत नाही? या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न या पत्रात मी केला आहे...
सर्वप्रथम मी लाजाळू नाहीये मी लोकांसमोर बोलत नाही म्हणजे मी लाजतो असे नाही जे बोलायचं असूनही बोलत नाही ते लाजाळू असतात. तुम्हाला माहिती आहे का ?की आपल्या मराठीत "मितभाषी" 'अंतर्मुख'असे शब्द आहेत आम्हाला बोलायची भीती नाहीये,तर इच्छा नाहीये, पण याचा अर्थ मी बोलू शकत नाही असा पण नाहीये. मी बोलू शकतो मी राजकारणावर बोलू शकतो, मी समाजकारणावर बोलू शकतो, मी अंधश्रद्धेवर बोलू शकतो आणि निर्भयावर पण बोलू शकतो. मी माझ्या गावाच्या छोट्या समस्यांवर बोलू शकतो आणि जगातील मोठ्या प्रश्नांवर थोडाफार तरी बोलू शकतो,पण मी बोलत नाही का विचारताय??अनेक कारणे आहेत मी बोलत नाही कारण मला माहित आहे की तुम्ही मला समजू शकणार नाही अहो समजणं दूर आहे पण तुम्ही माझं बोलणं पुर्ण ऐकूनच नाही घेणार आणि जेवढं ऐकाल त्यावरून मला चुकीचंच judge कराल.आणि तुमचं कसं बरोबर हे पटवून देण्याचा निरुपयोगी प्रयत्न कराल.बोलताना समोरच्याचा विचार करा त्यांच्या भावनेचा श्रद्धेचा विचार करा आणि डोक्यात आलेला विचार चारदा filter करून मग तुमच्यासमोर मांडा. बरं असं करूनही तुम्ही कुठेतरी दुखावले जाणार मग सर्व मलाच स्वार्थी भावनाशून्य म्हणणार. त्यापेक्षा नकोच हे सर्व .
मी काही extraordinary करणारा नाहीये.माझे विचार हे कोणाला तरी ऐकून, वाचून ,बघूनच तयार झाले आहेत. पण तुम्ही माझ्या आदर्शानाच नाव ठेवणार असतील तर मी का बोलावे तुमच्यासमोर.तुमचे आणि माझे विचार खरच खूप वेगळे आहेत actually ,तुम्ही आणि मीच भिन्न जातीचे आहोत.मला ज्यात आनंद भेटतो ते तुम्हाला फालतू वाटतं आणि तुमचा आनंद मला खूप मर्यादित वाटतो. तुम्हाला प्रेम व्यक्त करायला आवडतं आणि मला ते समोरच्याला कळूच नाही अस वाटतं .
प्रेम म्हणजे विरुद्ध लिंगी व्यक्ती बद्दल नव्हे तर मित्रमैत्रिणींबद्दल बद्दल सुद्धा मी काहीच व्यक्त करत नाही म्हणजे मला काही वाटतच नाही असं नाही. कितीही दुःखद प्रसंगात अश्रू आले नाही म्हणून मी पाषाणहृदयी होत नाही तेव्हा खरं तर मला समोरच्या व्यक्तीला आधार द्यायचा असतो.
मग मी यावर उपाय काढला आणि व्यक्त होण्यासाठी लिहू लागलो. लेख कथा इत्यादी पण लिहायला लागलो.पण खरं सांगू ते लिहिताना हे तुमच्या पासून कसे लपून राहील याचाच विचार जास्त करतो. आणि मी आधी फक्त डायरीत लिहायचो आता स्मार्टफोन्स आलेत. डायरी फक्त डायरी राहिली..
तुमचं खूप सोप आहे म्हणजे काय वाटेल ते बोलून मोकळे व्हायचे. मी खूप लिहितो त्यातलं काही सोशल मीडियावर टाकतो. 21व्या शतकातील वीस वर्षांचा मुलगा नातेसंबंधावर, रक्ताच्या नात्यांवर, येवढे ऋदयस्पर्शी कसं लिहू शकतो.याचे आश्चर्य आणि कौतुक वाटते आणि मी इथे माझ्याच रक्ताच्या नातेवाइकांपासून ते सर्व लपवतो.लोकांना प्रेम व्यक्त करायला आवडतं आणि मला ते लपवायला . माझी अपेक्षा पण नाहीये की तुम्ही ते ओळखावे पण निदान काहीच माहीत नसताना मला शिष्ट अथवा पाषाणहृदयी नका म्हणू.
माझ्या मित्रमैत्रिणींना असं काही वाटलं तर मी ते समजू शकेल कारण मी त्यांच्यासमोर बोलतो की I always private family over friends ..पण याचा अर्थ मित्रांना महत्त्व नाही असं नाही..इतरांसारखे जास्त नाही पण मलाही काही मित्र जवळ असले तर आवडतात.मी तुमच्या पार्टीच मध्ये येत नाही हे तुम्हाला दिसत,पण मी तुम्ही अडचणीत असताना तुम्हाला सोडून गेलो नाही..
असं म्हणतात की, introvert is personal user world is bigger than other world ,खरंच माझ्या आत इतकं काही चालू असतं की मला तुमच्या बाहेरच्या जगाचे भानच राहत नाही. माझे विचार वेगळे आहेत, माझे स्वप्न वेगळे आहेत आणि ते पूर्ण करायचे मार्ग देखील..कॉलेज वरून आल्यावर मूड ऑफ असला याचा अर्थ माझं माझ्या मित्रांची वाद झालेत तसा नसतो एखादा सिग्नलवर भीक मागणारा मुलगा नाही का अस्वस्थ करू शकत? मी movies ला येत नाही कारण तुम्ही जे चित्रपट बघतात ते मला नाही पटत आणि मला जे आवडतात ते तुम्हाला boar वाटतात.
यात तुमचा पण दोष नाही आणि माझा पण. तुम्ही कसे आहात ते कळालं, तुम्ही पण मला थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करता येतो का बघा ना जरा ??आज थांबतो.. एकदाच सर्व बोललो तर त्याचे side effects होतील, म्हणून आज पुरत एवढच. पुन्हा लिहील कधीतरी तोपर्यंत स्वतःवर प्रेम करत राहा, दुसऱ्यांवर करत रहा, प्रेमा सोबत आदर पण करा ..
Bye see you soon take care ..
तुमचाच ,
सोपान.....

Comments
Post a Comment