बेधुंद



सरळ रस्त्यापेक्षा वळणावळणाचे रस्ते मला आवडतात,त्यांना माहीत नसते रेघ. अशोक किंवा निलगिरी पेक्षा मला आवडतो तो वड, सगळीकडे उभा आडवा पसरलेला. एका रेषेतच जाणाऱ्या सुर्यकिरणांपेक्षा मला आवडतो तो वारा, मन वाटेल तिकडे पळणारा. सरळ पडणाऱ्या पावसाच्या थेंबापेक्षा जागा मिळेन तिथे वळणारी, डोंगरावरुन खळखळत वाहणारी नदीच मला जास्त वेड लावते. माझं आयुष्यही मला असंच जगायचय उधळलं तर उधळून द्यायचय, बेभान होऊन जसं ते नेईन तस मला त्याच्याबरोबर जायचंय, अगदी मोकाट, सुसाट, बेधुंद होऊन !

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2