मनाच्या कोपऱ्यात जपलेलं गाव ☂️🌈🌈

माझा एक मित्र मला म्हणाला की , नाहीतरी खेडी सोडायलाच च हवी, खेड्यात राहिलंच तरी काय ???
  त्याला मी म्हटलं, काय राहिलंय खेड्यात,अहो खेड्यात माती आहे,पाणी आहे ,जमीन आहे, पीकपाणी आहे ,अन्नाची मूळ उपज आहे ,माया ,ममता,प्रेम, नाती गोती, आकाश ,पाणी ,माती, रंग, आनंद, यात्रा, जत्रा,देव देवळ ,घाट, पायवाट, पान ,फुल ,पक्षी गाणं ,धूळ धुपाटा आहे..ऊन आहे, सावली आहे ,तुकोबा माऊली आहे ...सांज दुपार घंटानाद, अंगण मंगण ,अहो काय नाहीये खेड्यात... संध्याकाळी कधी माळावर चरणार्या गायीच्या गळ्यातील घुंगरू ची किणकिण ऐका आणि मग मला सांगा काय राहिलंय खेड्यात ते ...हे सांगताना माझ्या मनात कुठेतरी गाव सोडन्याची खंत होती..
हे फक्त माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मी जपलेल माझं गाव होत....

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2