कृतांत

माझं तर म्हणणं आहे की कुणाकडून अपेक्षा बाळगू च नाही कुणी?? का???
आपण जर एखादी गोष्ट passionately करत असू त्यातून अपेक्षा का बाळगू नये ??असा प्रश्न नक्कीच तुमचा असेल ...त्याच उत्तर अस की ,
अहो अपेक्षातून निर्माण होतात स्वप्न आणि ती पूर्ण झाली नाही ना की मानसिक त्रास होतो आणि शारीरिक त्रासापेक्षा मानसिक त्रास खूप वाईट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनपेक्षित बदल unexpected change .
एखादी गोष्ट मनाला समाधान देऊन जाते आणि एखादी गोष्ट मनाला टोचते पण .
चांगली गोष्ट घडते ना तर समाधान मानून घ्यावं 🤗 पण सावध व्हावं 😲की पुढे नक्की काहीतरी वाईट घडणार आहे आणि वाईट गोष्ट घडली ना की समाधान मानून घ्यावं 😑 की पुढं नक्की काहीतरी चांगलं घडणार आहे कारण बदल..... बदल हा निश्चित असतो change is the love of nature म्हणून मी म्हणतो की माणसाने थांबावं patience ..
अहो एखादा मूर्ख माणूस पण जीवनाच सत्य आणि रहस्य सांगून जातो तसाच एखादा मूर्ख समजा मला ..👍
गोष्ट सांगतो ती ऐका मग आता ...✍️
दोन भाऊ होते बाजूच्या गावातील जत्रा संपवून ते परत चालले होते आणि चालता चालता त्यांना एक वळण लागले पुढे आणखी थोडं दूर गेल्यावर त्यांना एक डबकं लागल त्या डबक्यातल्या पाण्याशी खेळताना त्यांच्या समोर एक बाई आली सुंदर देखणी रुबाबदार कुणीही तिच्या प्रेमात पडाव अशी लांबसडक काळेभोर केस,एखाद्या नक्षीदाराने कोरीव काम केलेल्या नक्षीदार भुवया, निळे निळे पाणीदार डोळे आणि ते पाणी ओसुंडुन वाहू नये म्हणून त्यावर घातलेला काजळाचा बांध, गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ओठ आणि खाली हनुवटीवर तीळ ,नाजूक नागमोडी कंबर ,नाजूक कमोनिया बांधा, हरीण चालते तशी चाल... दोन भावांमधला मोठा भाऊ तिच्यावर भावून च गेला नकळत तिच्या दिशेने जाऊ लागला तिच्या जवळ जाऊन तो तिच्याशी बोलला. ती त्याच्याशी नजरेने बोलायला लागली आणि ते बारक पोरग कधी तिच्याकडे कधी त्याच्याकडे बघतच राहील. ती वळली आणि मोठा भाऊ तिच्यामागे चालू लागला आणि ते बारक पोरग दबक्या पावलांनी त्यांच्यामागे चालू लागल ....
आणि चालता चालता ते एका पुलावर जाऊन थांबले तिने डोळ्यांनी इशारा केला तसा तो मोठा भाऊ लहान भावाला जाऊन बोलला की बाळा तू इथेच थांब हा आणि तो तिच्यामागे निघून गेला ....
खूप वेळ झाला पण तो काही परत आला नाही
आणि थोड्या वेळाने तिथे एक माणूस आला आणि त्या लहान मुलाला म्हणाला की तू काय करतोस इथे?? तेव्हा तो मुलगा म्हणाला की भावाची वाट बघतोय. त्यावर तो माणूस म्हणाला की बर बर जास्त वेळ थांबू नकोस हा रस्ता खूप वाईट आहे ..तो माणूसही निघून गेला पण ते पोरग आपल्या भावाची वाट बघत तिथेच थांबलं खूप वेळ झाला पण भाऊ काही परत आला नाही म्हणून ते पोरग आपल्या भावाला शोधायला पुढे निघालं पुढे त्याला शेकोटी केलेला एक माणूस दिसला त्या लहान मुलाने त्याला विचारले की माझा दादा दिसला का तुम्हाला?? त्या व्यक्तीने ही नाही म्हटलं ...
पुढे काय झालं ना की ते पोर त्याचा भाऊ परत येईल म्हनून पुलावर जाऊन थांबल आणि बराच वेळ झाला पण त्याचा भाउ परत आलाच नाही आणि  ते पोर त्याच्या भावाला शोधायला निघालं आणि चालता चालता त्याला कळलंच नाही की कुठे येऊन पोहोचलो.. एक तास झाला बरेच तास झाले शोधतच राहील डोक्यात विचार आणि मनात शंका याच्या भोवऱ्यात त्याला समोरचा रस्ता धूसर दिसायला लागला ..शेवटपर्यंत त्या मुलाला त्याचा भाऊ काही सापडला नाही शेवटी तो स्वतःच या जगात हरवून गेला ...
त्यावेळी ते पोर जरा थांबलं असत तर त्याचा भाऊ त्याला भेटला असता पण त्या पोराला कळलंच नाही हो तेव्हा, कुठे थांबायचं ते ..
अशीच गोष्ट आज त्या मुलाबरोबर झाली उद्या कदाचित कुना दुसर्याबद्दल घडेल ...
म्हणून म्हणतो की थांबणं चांगलं असत.... patience 👍
गोष्टी जरी काल्पनिक असल्या तरी त्यामध्ये खूप मोठा अर्थ दडलेला असतो बघा तुम्हाला शोधता आला तर .....
#कृतांत..

Comments

Popular posts from this blog

माझा valentine 2023

माझा Valentine 2023

"स्वप्नांना आयुष्य समजलो" part 2